भूम (प्रतिनिधी)-  यूवकांनी नौकरीच्या मागे न लागता व्यवसाय, उद्योग उभारणीची तयारी करावी. प्रशासकिय स्तरावर सर्वतोपरी सहकार्य करू असा विश्वास मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटिल यांनी आढावा बैठकित बोलताना दिला. 

शनिवार दि 13 सप्टेंबर 2025 रोजी भूम तहसिल कार्यालय सभागृहात मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिह पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपविभाग अधिकारी रेवैय्या डोंगरे, तहसिलदार जयवंत पाटिल, जिल्हा कृषि अधिकारी महादेव आसलकर, भाजपचे राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर, जिल्ह्यध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचेसह नागरीकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी आमदार पाटिल यांनी एमआयडिसी मधील खवा उद्योगाला भेट देवून पाहणी केली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटिल,  महादेव वडेकर, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर यांचेसह पदाधिकारी नागरिक मोठया संख्येन उपस्थित होते.


 
Top