कळंब (प्रतिनिधी)- सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई वतीने व ब्युरो व्हेरीटास कंपनी च्या सहकार्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा तालुका कळंब या शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर व विविध शैक्षणिक साहित्याचे दिनांक 15 रोजी वाटप करण्यात आले.
मुंबई येथील सेवा सहयोग फाउंडेशन व ब्युरो व्हेरिटास कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद भाटशिरपुरा प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली व दुसरीच्या 35 विद्यार्थ्यांना दप्तर व त्या दप्तरांमध्ये विविध शैक्षणिक साहित्य तसेच इयत्ता पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांना रजिस्टर, वह्या, चित्रकलेची वही विविध प्रकारचे रंग, कंपास पेटी अशा विविध साहित्याची एक किट विद्यार्थ्यांना देण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेवा सहयोग फाउंडेशन चे जिल्हा प्रतिनिधी विनोद सुरवसे सरपंच सौ.सुनीता दिलीप वाघमारे, उपसरपंच सूर्यकांत खापे, सोसायटीचे चेअरमन अच्युत गायकवाड, दिलीपराव वाघमारे, कोंडीबा कदम,विकास गायकवाड, प्रतिक गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी सेवा सहयोग फाउंडेशन चे जिल्हा प्रतिनिधी विनोद सुरवसे यांनी फाउंडेशनचा हेतू ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सेवा सहयोग फाउंडेशन काम करत असल्याचे सांगितले.
यावेळी उपसरपंच सूर्यकांत खापे, प्रतीक गायकवाड यांनी शिक्षकाप्रती भावना व्यक्त केल्या तसेच शाळेतून बदलून गेलेले शिक्षक शहाजी बनसोडे, प्रमोदिनी होळे व रंजना थोरात यांनी आपल्या कार्यकालातील शाळेतील आठवणीला उजाळा दिला. याप्रसंगी पांडुरंग गायकवाड, संदीप गायकवाड, अमोल सिरसट, अशोक सिरसट,केशव फकीर, हरिश्चंद्र सिरसट,आरेफ शेख, विजयकुमार गायकवाड, अशोक गायकवाड,श्रीकृष्ण वाघमारे, विकास सिरसट यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक सचिन तामाने नागेंद्र होसाळे लिंबराज सुरवसे श्रीमती राजकन्या तोडकर श्रीमती कालींदा मुंडे श्रीमती राजकन्या वाघमारे राजाभाऊ शिंदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे सूत्रसंचालन श्रीकांत तांबारे यांनी केले तर आभार अमोल बाभले ळ यांनी मानले.
केलेलांचा निरोप शिक्षकांना निरोप, आलेल्यांचे स्वागत
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपूर या ठिकाणी गेल्या 7 वर्षापासून उत्कृष्ट सेवा केलेले शहाजी बनसोडे,श्रीमती प्रमोदिनी होळे व श्रीमती रंजना थोरात हे बदलून गेल्यामुळे त्यांना निरोप देण्यात आला तर नागेंद्र होसाळे, श्रीमती कालिंदा मुंडे व श्रीमती राजकन्या तोडकर हे शिक्षक शाळेत नव्यानं बदलून आल्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले.