धाराशिव (प्रतिनिधी)-  जागतिक पातळीवर 29 जुलै रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव येथील प्राणीशास्त्र विभाग यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वाघ संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. निबंध स्पर्धेसाठी विषय “वाघाचे जैविक महत्त्व आणि संवर्धनाची गरज“हा देण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विविध वर्गांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी वाघाच्या परिसंस्थेमधील भूमिकेपासून ते मानवी अतिक्रमण, शिकारीसारख्या समस्यांवर सखोल विचार व्यक्त केला. निबंधांची परीक्षणे विषयतज्ज्ञ प्राध्यापकांनी केली व उत्कृष्ट निबंधांसाठी पारितोषिके पायाळ शौर्य (बी.एससी भाग 1) मधील विद्यार्थ्याला जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.


 
Top