उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील समर्पण बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने तालुक्यातील विविध शाळांतील ए. टी. एस. प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा येथील आर्यसमाज सभागृहात गुणगौरव करण्यात आला. यावेळी एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेत राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर प्राविण्य मिळवणाऱ्या 92 विद्यार्थ्यांना उमरगा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, उपनिरीक्षक गजानन पूजारवाड, ज्ञानदान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरणप्पा मुदकण्णा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळीं सार्थक चुंगे व संचित चुंगे यांनी राज्यस्तरावर प्राविण्य मिळवल्याबद्दल सन्मानचिन्ह, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुंजोटी घंटामठाचे सचिव बसप्पा माळगे गुरुजी होते. तर सरपंच सौ. कौसल्या बेळमकर, माजी सरपंच सहदेव गायकवाड, शिक्षक संघाचे उमरगा तालुकाध्यक्ष विजयकुमार ओवंडकर, माजी ग्रामपंचायत सदस्य दशरथ देवकते, गुंजोटी सोसायटीचे संचालक ओम शिंदे, शिवसेना विभागप्रमुख काका गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव किशोर व्हटकर यांनी केले. सूत्रसंचालन तन्मय शेटगार यांनी तर आभार विक्रम व्हटकर यांनी मानले.
यावेळी उमरगा तालुक्यातील विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी साईराज कटकधोंड, विक्रम व्हटकर, तन्मय शेटगार, शिवानंद जोगे, प्रताप शिंदे, राम जाधव, सुनील.चौधरी, अशोक बिराजदार, आकाश कटकधोंड यांनी पुढाकार घेतला.