धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL), धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक धनंजय जेवळीकर उपस्थित होते. त्यांनी शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावरील उपयुक्त मार्गदर्शन करून डिजिटल युगातील शैक्षणिक साधनांचा प्रभावी वापर कसा करावा, यावर प्रकाश टाकला.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, उपप्राचार्य संतोष घार्गे, तसेच इयत्ता 5वी ते 10वीचे पर्यवेक्षक वाय. के. इंगळे, बी.बी. गुंड, एस. जी. कोरडे, आर.बी.जाधव, बी. एम. गोरे यांची मान्यवर म्हणून उपस्थिती होती. मान्यवरांचा सत्कार अण्णा इन्फोटेकचे समन्वयक स्वामी वैजनाथ , आइडिअल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे लहु भानवसे, ग्लोबल इन्फोटेकचे प्रितम सुर्यवंशी, मिनाक्षी कॉम्प्युटर्सचे रोहित झाडे आणि सिनर्जी इन्फोटेकचे मा. संतोष बनसोडे यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.