कळंब (प्रतिनिधी)- कळंब येथे मोहम्मद पैगंबर जयंती निम्मित काढण्यात आलेली जुलूस मिरवणुकीत कायद्याचं पालन न करणाऱ्या खालील पंधरा जणांवर बीएनएस 223 कलमाप्रमाणे कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये बिलाल शखनूर बागवन रा.कळंब, प्रेम नवनाथ जाधव रा. चारोली ता.जि. पुणे, फरदिन सलामत पठाण रा.मोमीन गल्ली कळंब, राणा अजय सरवदे रा. दत्त नगर कळंब, मुजमिल हारुन शेख रा. चोंदे गल्ली कळंब, उमर अब्दुल रौफ शेख रा. चोंदे गल्ली कळंब, रिझवान जकीरद्दीन सिद्दीकी रा. कळंब, अभिषेक चव्हाण रा. सातारा, कैफ अफजल मिर्झा रा. पापडे गल्ली कळंब, साकीब जावेद शेख रा. गणेश नगर डिकसळ, सैफ शेख रा.कळंब, युनूस पाशुमिया शेख रा.संतोष नगर कात्रज पुणे, आबेद रफिक सय्यद रा.इस्लामपुरा डिकसळ, अब्दुल रब वहाब मणियार रा. डिकसळ, अक्षय अविनाश सिरसाट रा.तळेगाव दाभाडे ता.मंचर जि. पुणे यांचा समावेश आहे.
या मिरवणुकीत बंदी असताना डॉल्बी लावण्यात आलेली होती. या संदर्भात पत्रकार मुस्तान भाई मिर्झा यांनी सोशल मीडियावर सडेतोड भाष्य केल्यानंतर पोलिसांनी डॉल्बी बंद केली होती. दुसऱ्या दिवशी शहरातील नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारा दाखल केल्या नंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या संदर्भात संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर ही गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन क्षीरसागर यांनी केली आहे.