वाशी (प्रतिनिधी)- येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात 1200 एकर जागेवरील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आ.राणाजगजीतसिंह पाटील व उद्योजक,स्थानिक नागरिक आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
यावेळी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थित असलेल्या तालुक्यातील उद्योजक व नागरिकांना मार्गदर्शन केले.तसेच याप्रसंगी वाशी शहर व परिसरातील उद्योजक यांनी आपले मत व्यक्त केले. या संदर्भात विविध प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली.यावेळी वाशीचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे साहेब,धाराशिव एमआयडीसी चे अधिकारी श्रीचंद्र राठोड साहेब, मुख्याधिकारी शिंदे साहेब तसेच वाशी व तेरखेडा परिसरातील सर्व उद्योजक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.