तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील बसस्थानकावर एका महिलेचा गळ्यातील सोन्याचा दागिना अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे.11 सप्टेबर 2025 रोजी दुपारी 2.30 वा घडली.

या प्रकरणी  संगिता महावीर कंदले (वय 45, रा. व्होर्टी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) या 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता तुळजापूर येथून जळकोट गावी जाण्यासाठी उमरगा एस.टी. बसमध्ये चढत होत्या. यावेळी बसस्थानकावर मोठी गर्दी होती. त्या गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात महिलेने त्यांच्या गळ्यातील 12 ग्रॅम वजनाचे, सुमारे 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले. घटनेची नोंद तुळजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


 
Top