कळंब (प्रतिनिधी)- सतत पडणाऱ्या पावसामुळे कळंब शहरात साथीच्या रोगांचे  प्रमाण वाढले आहे. तापीचे रुग्ण वाढले आहेत डेंगू, मलेरिया सारखे गंभीर आजार डोक वर काढत आहेत, सर्दी खोकला ताप व विविध साथीच्या आजाराचे रुग्णांनी दवाखाने गच्च भरले आहेत. लहाना पासून ज्येष्ठ नागरिक देखील हैराण झाले आहेत.अशी तक्रार ॲड .मनोज चोंदे यांनी केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने आपण तात्काळ शहरात स्वच्छता मोहीम राबवून या कार्यालयास तसा तात्काळ अहवाल सादर करावे असे आदेश उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांनी कळंब नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना एका पत्राद्वारे दिले आहेत. 

कळंब शहरातील प्रत्येक नागरिका कडून शिक्षण करत घेतला जातो. मात्र शाळा महाविद्यालय परिसरात फवारणी करा असे नगरपरिषद प्रशासनास विनंती केली असता त्या भागात आमचा काही संबंध नाही असे उत्तरे दिले जात आहेत. व अशी आडमुठी भूमिका घेऊन नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले आहे.

कळंब शहरामध्ये शासकीय कार्यालय आवारामध्ये शाळा महाविद्यालय परिसर तसेच शासकीय खुल्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. या गवतावर मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हे डास चावल्याने ताप येणे डेंगू होणे, मलेरिया होणे, अंगाला फोड येणे, एलर्जी होऊन अंग खाजवणे अशा समस्याचे रुग्ण वाढले आहेत. असे गवत प्रामुख्याने लता मंगेशकर शाळा परिसर, महसूल कॉलनी तहसील कार्यालयाच्या आवारात तसेच जिल्हा परिषद कन्या शाळा, जिल्हा परिषद मुलांची शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचे आजूबाजूच्या  सर्व पडीक शासकीय जागेत मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. आठवडी बाजार मैदान बस स्टँड परिसर, संत तुकाराम महाराज चौक ते देवी मंदिर कडे जाणाऱ्या रोडच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे इथेच रविवारचा भाजीपाल्याचा बाजार भरतो हाच भाजीपाला प्रत्येक घरात जातो या भागातील अस्वच्छतेमुळे रोगराई चे प्रमाण देखील वाढले आहे.

या भागात तन नाशक व कीटकनाशक फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे नगरपरिषद प्रत्यक भाजी वेक्रेता शेतकऱ्याला 20 रुपये आकारणी भाजीपाला विक्री करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून वसूल केले जातात तरी परंतु स्वच्छता मोहीम या भागात नियमित राबवली जात नाही. तसेच संपूर्ण कळंब शहरामध्ये नालेसफाई करणे, सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा साफ करणे,घरोघरी संडपण्यामध्ये अबेटिंग करणे, मच्छर चे प्रमाण रोखण्यासाठी कीटकनाशक फवारणी करणे व फॉगिंग धूर फवारणी करणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नितांत गरजेचे आहे. नगरपरिषद प्रशासनाला वारंवार विनंती करून देखील अद्याप नागरिकांच्या मागणीची दखल नगरपरिषद प्रशासनाकडून घेतली जात नाही.

तरी आपण त्यांना कळंब  शहरांमध्ये गवतावर तन नाशक व कीटकनाशक फवारणी करण्याचे, संपूर्ण शहरामध्ये अबॅटिंग करण्याचे फॉगिंग करण्याचे व नालेसफाई करण्याचे सार्वजनिक ठिकाणी पडलेला कचरा साफ करण्याचे व साथीचे रोग पसरू नयेत म्हणून आवश्यक ते सर्व उपाय तात्काळ राबवूनअसावा या कार्यालयास सादर करावा असे आदेश देण्यात आल्याने कळंब शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

 
Top