भूम (प्रतिनिधी)- भूम शहर व परिसरात दि. 18 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने बाणगंगा नदीने रौद्ररुप धारण केले होते. मागील वर्षी नगरपरिषद मार्फत बाणगंगा नदीचे रुंदीकरण व खोलीकरण झाल्यामुळे कसबा विभागांमध्ये नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. मात्र माजी नगराध्यक्ष यांनी स्वतः जातीने लक्ष घालून या बानगंगा नदीचे संपूर्ण खोलीकरण व रुंदीकरण केल्यामुळे नदीमधील पाणी कसबा विभागामध्ये शिरले नाही.
कसबा विभागातील व पेठ विभागातील नागरिकांनी महादेव मंदिर, अंबाबाई मंदिर, मेहंती शावली दर्गा, सिद्धेश्वर उद्यानाच्या पाठीमागे, वारे वडगाव रोड, बाजार रोड, अशा ठिकाणी महिलांनी, ज्येष्ठ नागरिक, तसेच बच्चे कंपन्यांनी या वाहणाऱ्या पाण्याचा मनमुराद आनंद घेतला. तसेच कसबा विभागातील नागरिकांनी सुरक्षा म्हणून दोन्ही बाजूला ये-जा करणाऱ्या नागरिकांना सुरक्षित बाजूला केले.