तुळजापूर (प्रतिनिधी)-श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे जूनियर महाविद्यालयात अस्तित्वात असलेल्या कला व वाणिज्य विद्याशाखाना जोडून विज्ञान विद्याशाखा मंजूर करण्यासाठी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. त्याबद्दल आमदार पाटील यांची कृतज्ञता व्यक्त करण्यात आले. तसेच अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ जिल्हा धाराशिव कार्यकारणी गठीत केल्याची माहिती देण्यात आली. या निमित्त आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी “प्राध्यापक हे देश हिताचे कार्य करतात, त्यांनी अशा संघटनेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून देश हिताचे कार्य सतत आणि निरंतर करावे“ असे मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर सर्व धाराशिव जिल्हा संघटन पदाधिकाऱ्यांना कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी तुळजाभवानी महाविद्यालयातील प्र. प्राचार्य डॉ.जीवन पवार, प्रा. डॉ. नेताजी काळे, प्रा. क्षीरसागर, प्रा. बालाजी कराडे, प्रा.सुदर्शन गुरव, प्रा. वागतकर, प्रा. वसावे सर उपस्थित होते.