तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील पंचायत समिती पाठीमागील रस्त्यावर शनिवारी दि. 13 सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. रस्त्यावर पडलेले एक-दोन दिवसांचे अभ्रक वाहनाखाली येऊन चेंदामेंदा झाले, आणि पाहता पाहता परिसरात चर्चा रंगली “माता तु वैरीण कशी बनली?”
हा रस्ता एसटी कॉलनी व पापनाश तिर्थकुंडकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग असून, अविनाश जाधव यांच्या घरासमोर हे अभ्रक पडले होते. जाधव कपडे घालून खाली येताच वाहन त्यावरून गेले आणि अभ्रकाची चिरडून अवस्था झाली.
विशाल रोचकरी यांनी नगरपरिषदेला माहिती दिली. परंतु त्यांनी हा विषय पोलिसांच्या अखत्यारीत असल्याने पोलिसांना कळवला. तोपर्यंत मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली. सदरील नवजात अभ्रक मानवी कि कोणत्या प्राण्याचे या बाबतीत सांशकता असल्याचे पोलिसांकडुन सांगण्यात आले.त्या वैद्यकीय अहवाल नंतर या मागचे गुढ उलगढणार आहे.
अद्याप हे अभ्रक कोणी टाकले, कुठून आले याचा उलगडा झालेला नाही. तसेच ते स्त्री जातीचे की पुरुष जातीचे हेही स्पष्ट होऊ शकलेले नाही. शाळा-कॉलेजजवळ घडलेली ही घटना स्थानिकांमध्ये चिंतेचा विषय ठरली आहे. तपासानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.