कळंब (प्रतिनिधी)- बांबू ही वेगाने वाढणारी वनस्पती असून ही गवत वर्णीय बाहुगुणी,बहु उपयोगी , औषधी,ऑक्सीजन देणारी अशी वनस्पती आहे बांबूच्या शेतीपासून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो याचा उपयोग प्रामुख्याने घर, फर्निचर, व विविध उपयोगी वस्तू तयार करण्यासाठी होतो संत ज्ञानेश्वर बालकाश्रम कळंब येथे महादेव महाराज अडसूळ यांनी मोठ्या प्रमाणावर बांबू वृक्ष लावले आहेत. १८ सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिनाच्या निमित्ताने आश्रमाच्या या परिसरात बांबू पूजन कार्यक्रम घेण्यात आला,.
सहशिक्षक व पत्रकार प्रदीप यादव यांच्या हस्ते बांबू पूजन करण्यात आले तसेच त्यांचा वाढ दिवसानिमित्त सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या ,याप्रसंगी आश्रम संचालक महादेव महाराज अडसूळ, विठ्ठल माने, राजेंद्र बिक्कड, अमर चोंदे, सुरेश टेकाळे, अनिल यादव,प्रतीक गायकवाड,अशोक काटे, राजाराम त्रिमुखे,महादेव खराटे, डॉ, गिरीश कुलकर्णी, माधवसिंग राजपूत,बापू भंडारे, सोपान पवार बाळासाहेब कांबळे, बाळासाहेब कुलकर्णी,पोपट साळवे, विठ्ठल पुट्टेवाड,प्राचार्य महादेव गपाट, सरस्वती अडसूळ यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.