धाराशिव (प्रतिनिधी)-  उमरगा व लोहारा तालुक्याच्या सर्वांगीन विकासाला चालना देण्यासाठी महास्ट्राइड उपक्रमांतर्गत उमरगा तहसील कार्यालयात आढावा बैठक पार पडली. शुक्रवार दि 12 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या या बैठकीस मित्र संस्थेचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, अभय चालुक्य यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

बैठकीत तालुक्याच्या विकासासाठी विविध योजनांवर सविस्तर करण्यात आली. यात उमरगा तालुक्यासाठी एमआयडीसीसाठी अतिरिक्त जमीन उपलब्ध करून देणे, अचलबेट येथील धार्मिक पर्यटन स्थळाचा विकास करणे, उमरगा व लोहारा तालुक्यातील शैक्षणिक सुविधा वाढवण्यासाठी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज मागणी करण्यात आली. याबरोबर येथे असलेल्या आयटीआय कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल इन्स्टिट्यूट सुरू करणे यांसारख्या महत्त्वपूर्ण मागण्या या बैठकीत मांडण्यात आल्या. या योजनांमुळे दोन्ही तालुक्याच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक प्रगतीला नवे बळ मिळणार असून स्थानिकांना रोजगारनिर्मितीची संधीही उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. एकत्रित विचारमंथनातून विकासाच्या वाटचालीला गती मिळेल असा ठाम विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला. बैठकीत झालेल्या चर्चेतून उमरगा लोहारा तालुक्याच्या विकासाला निश्चितच नवीन दिशा मिळेल. अशी अपेक्षा उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

 
Top