धाराशिव (प्रतिनिधी)-  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यास अनुसरुन दरवर्षी प्रमाणे स्वच्छता ही सेवा मोहिम दि. 17 सप्टेंबर 2025 ते दि. 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ग्रामपंचायतींनी प्रभावी पणे राबवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.

या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा 2025 साठी “ स्वच्छोत्सव ” ही थीम निश्चित केली आहे.  दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी स्वच्छता ही सेवा मोहीमेचा शुभारंभ तालुकास्तर व गावस्तरावर परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबवुन करण्यात येणार आहे. स्वच्छता लक्ष युनिट अस्वच्छ ठिकाणांची निवड करुन सदर ठिकाणांची मॅपिंग आणी स़ाफस़फाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता - संस्था/ प्रतिष्ठान व जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणांची स्वच्छता करण्यात येणार आहे. 

स़फाईमित्र सुरक्षा शिबिरे, क्लीन ग्रीन उत्सव, प्रबोधनपर उपक्रम आदीद्वारे स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. सदरील उपक्रम ग्रामपंचायत यांनी प्रभावीपणे राबविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा परिषद धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष व जल जिवन मिशनचे प्रकल्प संचालक मनोज राऊत यांनी केले आहे.


स्वच्छता ही सेवा पंधरवडा म्हणजे केवळ मोहिम नसून हा सामूहिक कृतीचा उत्सव आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या सहभागातूनच धाराशिव जिल्हा स्वच्छ, निरोगी व सुजल बनविण्याचे ध्येय साध्य होईल. 

- मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.मैनाक घोष.

 
Top