तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवा पुर्व तयारीवर पावसाचे विघ्ने आले आहेत. दररोज सुरू असलेल्या पावसामुळे स्वच्छता, दुरुस्ती, रंगरंगोटी, धुणेधुण्याची कामे अर्ध्यावरच अडकून पडली आहेत. काही कामे पावसात वाहुन जात आहे.

तुळजापूर कर विघ्नहर्ता विसर्जनानंतर लगेच शारदीय नवराञोत्सव पुर्व तयारी सुरू करतात. माञ या पुर्वतयारीवर पावसाचे पाणी फिरत आहेत. मागील अनेक दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे. पावसाने घरातली दुरुस्ती स्वछता रंगरंगोठी कामे खोळंबले आहे. राञी केलेली कामे दिवसा पडलेल्या पावसामुळे वाहुन जित आहे.

सोमवार, दि. 22 रोजी घटस्थापनेने शारदीय नवराञोत्सव उत्सवाचा शुभारंभ होत आहे. परंपरेनुसार मोठ्या जल्लोषात देविदर्शनार्थ लाखो भाविक येणार आहेत. मात्र आत्ताच्या घडीला “पाऊसच पुर्वतयारीला  आडवा येतोय,”त्यामुळे ‌‘करावं काय?' असा प्रश्न सर्वांना पडला आहे. शहरातल्या गल्लीबोळापासून मंदिर परिसरापर्यंत तयारीची लगबग असली तरी पावसाने विघ्न घालून टाकलं आहे. नवरात्राच्या आधी शहर सुशोभित व्हावं, ही अपेक्षा. पण पावसामुळे कामं झाली आहेत “ना इथं ना तिथं”या पावसाचं काय करायचं? हा प्रश्न तुळजापूरच्या शहरवासीयांसमोर उभा ठाकलाय.

 
Top