भूम ( प्रतिनिधी) भूम शहरातील कसबा विभागातील श्री संत सेना महाराज मंदिरामध्ये संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली .
यावेळी माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे व संयोगिता गाढवे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून महाआरती करण्यात आली .या कार्यक्रमानिमित्त कसबा भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता .त्यानंतर महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .यावेळी प्रदीप चौधरी ,दादा राऊत ,संभाजी चौधरी,राकेश चौधरी, संजय चौधरी , आश्रु चौधरी ,बाळासाहेब चौधरी ,प्रवीण शिंदे ,श्रीराम चौधरी,विकास यादव ,विकास राऊत ,सचिन चौधरी ,नितीन चौधरी,दत्ता चौधरी ,विलास चौधरी ,अक्षय चौधरी ,मयूर चौधरी ,उदय चौधरी ,बालाजी चौधरी यांच्यासह नाभिक समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते .