भूम (प्रतिनिधी)- परंडा विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे.या अतिवृष्टीमुळे भूम तालुक्यातील हिवरडा येथील साठवण तलावाचा सांडवा मोठ्या प्रमाणावर खचल्याची गंभीर बाब निदर्शनास आलेली आहे. त्याचप्रमाणे मु.पो.जांब येथील दऱ्यातील जांब-इराचीवाडी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याची भिंत कोसळलेली आहे. यामुळे सदरील तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.तसेच मु.पो.डुक्करवाडी येथील साठवण तलावाच्या सांडव्याच्या दोन्ही बाजूच्या भिंती पडलेल्याअसून त्यामुळे येथील तलावास धोका निर्माण झालेला आहे..
तरी तात्काळ भूम तालुक्यातील या तिन्ही ठिकाणच्या तलावाची प्रत्यक्ष स्थळपाहणी करणे आणि यावर तातडीची उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना द्याव्यात यासाठी परांडा भूम वाशीचे माजी आमदार तसेच 243 परांडा मतदारसंघामध्ये ज्यांनी शाश्वत सिंचनाची व विजेची विकासकामे केली असे माजी आमदार राहुल मोटे यांनी जिल्हाधिकारी,धाराशिव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.