तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरातील हरविलेले तसेच गहाळ झालेले मोबाईल परत मिळण्याची शाश्वती कमी असताना तुळजापूर पोलिसांनी तब्बल तीन वर्षानंतर फौजी शहीद.विजय दरेकर यांचा तीन वर्षाखाली हयात असताना गहाळ झालेला मोबाईल त्यांच्या मुलगा अर्जून विजय दरेकर व सौ वर्षा ज्ञानेश्वर जाधव रा. वेताळ नगर यांचा मोबाईल पुन्हा परत मिळविण्यात पोलिसांना यश मिळविले. 

संबंधित नागरिकांना हे मोबाईल पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या हस्ते परत करण्यात आले. यावेळी पोलिस संतोष करवार, पोलिस मारुती माळी आदि उपस्थित होते.त्यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.

 
Top