कळंब (प्रतिनिधी)- कळंब बसआगार कर्मचारी जयंती उत्सव समितीच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या  105 वी जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले   श्री दत्त मंदिर सभागृहात साहित्यरत्न अण्वणाभाऊ साठे यांची  प्रतिमा मांडण्यात आली होती या ठिकाणी आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती  याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कळंब बसआगार  प्रमुख  खताळ एस.डी. हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अतुल गायकवाड  संभाजी ब्रिगेड मराठवाडा संघटक , प्राचार्य जगदीश गवळी , अच्युतराव माने प्रदेश सचिव गुणवंत कामगार असोसिएशन , निलेश जाधव वाहतूक निरीक्षक ,पत्रकार माधवसिंग राजपूत, सामाजिक कार्यकर्ते उदय खंडागळे सचिन क्षिरसागर , नवनाथ भंडारे जिल्हाध्यक्ष बहुजन जनतापक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष बसआगार प्रमुख  खताळ एस.डी.यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण  केला यानंतर   प्रमुख पाहुणे व वक्ते प्राचार्य जगदीश गवळी यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य विद्रोही व विषम समाज व्यवस्थेच्या विरोधात होते अण्णाभाऊ साठे यांचे नांव तुकाराम होते व संत तुकाराम महाराज यांनीही समाजातील दांभिकता व अंधश्रद्धेच्या विरोधात अभंगातून जागृती केली असे सांगितले, दीड दिवसाच्या शाळेत शिकलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी कमी कालावधीत मोठे व समाजाला दिशा देणारे साहित्य निर्माण केले असे सांगितले  ,अतुल गायकवाड यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठे यांचे   कामगार चळवळ व संयुक्त महाराष्ट्र चळवळ यातील योगदान मोठे असून खऱ्या अर्थाने मराठी भाषा समृद्ध करण्याचं बाहेर देशात पोहोचण्याचा काम अण्णाभाऊ साठे यांनी केला आहे त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव  दिन म्हणून साजरा व्हायला हवा असे सांगितले तर पत्रकार माधवसिंग राजपूत यांनी अण्णाभाऊ साठे यांचे लिखाण वास्तववादी व अनुभवावर आधारित असे आहे  त्यांच्या कथा कादंबरीत विषम व्यवस्थेशी झगडणारे बंडखोर नायक समोर आणले,  तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा त्यांनी भारताबाहेर रशिया या देशात गायन केला असे सांगितले तर सचिन क्षिरसागर यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठे यांचा व्यक्तिमत्व इतकं मोठं होतं परंतु अण्णा भाऊ समाजाला समजले नाही याची खंत व्यक्त केली, अच्युतराव माने यांनी अण्णाभाऊ साठे यांनी कामगारासाठी मोठं कार्य केलं आहे आज कामगारांना सोयी सवलती मिळत आहेत याचा लाभ घ्यायला हवा असे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन सुबोध रणदिवे यांनी तर आभार गवळी मॅडम यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे मनोज मुळीक, आबासाहेब चौधरी, कांबळे अकाउंटंट, गवळी मॅडम सोनवणे मॅडम यांच्यासह कळंब बस हजारातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

 
Top