भूम (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यातील पीएमश्री आदर्श जिल्हा परिषद प्रशाला ईट शाळेची केंद्र सरकारच्या 'पीएम श्री शाळा' योजनेत देशातील सर्वोत्तम 644 शाळांमध्ये  निवड झालेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास असलेली ही शाळा आधुनिक तंत्रज्ञान आणि शैक्षणिक सुविधांमुळे शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे. लवकरच उत्कृष्ट काम करत असलेल्या या प्रशालेला विभाग स्तरावर नंबर मिळालेले आहेत. तर राज्यातील चांगली शाळा म्हणून शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते, पालकमंत्र्याच्या हस्ते पारितोषक मिळालेले आहेत.  या शाळेला केंद्र सरकारच्या ‌‘पीएम श्री शाळा' योजनेअंतर्गत देशातील सर्वोत्तम शाळांमध्ये स्थान मिळाले आहे. 

पहिली ते दहावी इयत्तेपर्यंत शिक्षण देणारी ही शाळा 1914 साली स्थापन झाली असून, स्वातंत्र्यपूर्व काळातील ही शाळा आहे. शाळेने आधुनिक तंत्रज्ञानासह विविध भौतिक व शैक्षणिक सुविधा उभारून शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. डिजिटल क्लासरूम, सीसीटीव्ही, आधुनिक ग्रंथालय, सोलर पॅनल,  विवीध शिबिर, आर्थिक साक्षरता उपक्रम आणि आरोग्य शिबिरे यांसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी इथे करण्यात आली आहे. तर विद्यार्थ्यांना वॉटर फिल्टर द्वारे शुद्ध व थंड पाणी, सकाळच्या परिपाठासाठी सुद्धा भव्य सुंदर अशा शेडचे निर्माण या ठिकाणी करण्यात आलेले आहे. अर्थातच यासाठी सर्व शिक्षकांची, पालकांची, ग्रामपंचायत, गावकऱ्यांची नेहमीच मदत होत असते.

या यशामध्ये माजी मुख्याध्यापक पांडुरंग कवडे मुख्याध्यापक जयराम कचरे, सहशिक्षक जयचंद सातपुते, सहदेव हुंबे आणि ग्रामस्थांचा मोठा वाटा आहे. शालेय समितीचे अध्यक्ष सोमेश्वर स्वामी म्हणाले “ग्रामीण भागामध्ये प्राथमिक शिक्षणालाच आम्ही प्राधान्य देतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे “


धाराशिव जिल्ह्यामधून आमच्या ईट शाळेला देशात अव्वल स्थान मिळाले आहे. शालेय शिक्षण समिती, सर्व शिक्षकांचे परिश्रम, ग्रामस्थांकडून मिळालेले प्रोत्साहन यामुळे शाळेला मिळालेला मान आमच्यासाठी व ईट ग्रामस्थांसाठी महत्त्वाचा आहे.

जयराम कचरे

मुख्याध्यापक 

 
Top