धाराशिव (प्रतिनिधी)-  सायबर गुन्हेगाराने ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली होती. त्यामधील पैशाने केलेल्या खरेदीची ऑर्डर रद्द करून फिर्यादींचे एकूण 1 लाख 99 हजार रूपये रिफंड करण्यात धाराशिव सायबर पोलीसांना यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार रिया निखिल अंधारे वय 21 वर्ष व्यवसाय गृहिणी रा. कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांना दि.23/07/2025 रोजी व्हॉट्सॲपवर ग्रुपवर आरटीओ चलनाची एपीके फाईल आली. त्यांनी ती एपीके फाईल डाउनलोड केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर ओटीपी येउन पैसे डेबिट झाल्याचे मेसेज येउ लागले. त्यानंतर तक्रारदार यांच्या क्रेडीट कार्डमधून 1 लाख 99 हजार रूपये विथड्रॉल झाल्याचे मोबाईलवर मेसेज आले. त्यावेळी तक्रारदार यांनी तात्काळ हेल्प लाईन क्र. 1930 वर कॉल करून एनसीसीआर पोर्टलवर क्र. 31907250127253 अन्वये तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर धाराशिव सायबर पोलीसांनी तांत्रिक तपास केला असता फसवणूक झालेली रक्कम इन्फीबीम ॲव्हेन्यू पेमेंट गेटवेवारे ड्राईव्ह ट्रॅक प्लस एचपीसीएल या कंपनीला वर्ग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर तात्काळ संबंधित नोडल अधिकारी यांचेशी इमेलद्वारे व फोनद्वारे संपर्क केल्यानंतर सदर रक्कमेतून आरोपीने ऑनलाईन शॉपिंग केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर तात्काळ संबंधित कंपनीच्या नोडल अधिकारी यांचेशी संपर्क करून सायबर गुन्हेगाराने ऑनलाईन फसवणूकीतील रक्कमेतून ऑनलाईन खरेदीची ऑर्डर रद्द करून यातील फिर्यादींचे 1 लाख 99 हजार रूपये रिफंड करण्यात धाराशिव सायबर पोलीसांना यश आले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चोरमले, सहायक पोलिस निरीक्षक कामुळे, पोउनि सर्जे, सफौ कुलकर्णी, पोहक हालसे, मपोना पौळ, पोशि सुर्यवंशी, पोशि मोरे, पोशि तिळगुळे, पोशि कदम, पोशि काझी, मपोशि शेख, मपोशि खांडेकर, पोशि शिंदे, पोशि पुरी, पोशि अंगुले पोशि  बिराजदार, पोशि गाडे, पोशि जाधवर व पोशि भोसले यांनी केली आहे.


 
Top