तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील माळुंब्रा येथील ग्रामसेविका सुनिता गायकवाड वेळेवर येत असुन ग्रामस्थांनी कामासाठी केलेला फोन ही उचलत नसल्याने ग्रामसेविका गायकवाड यांना ग्रामपंचायत कार्यालयात वेळेवर उपस्थिती राहण्यास सांगावे. अशी मागणी बालाजी वडणे गटविकास आधिकारी हेमंत भिंगारदेवे यांना निवेदन देवुन केली.
निवेदनात म्हटले आहे कि, ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असणाऱ्या ग्रामसेविका सुनिता गायकवाड या ग्रामपंचायत मध्ये वेळेवर येत नाहीत कामासाठी केलेले काँल उचलत नाहीत. आले तर वेळेचे बंधन पाळत नाहीत. यांच्याकडे फक्त माळुंब्रा एकमेव्य ग्रामपंचायत असताना त्या कार्यालयीन वेळेचे बंधन पाळत नाहीत. तरी यांना ग्रामपंचायत कार्यालयीन वेळेत उपस्थिती राहण्या. सांगावे. अशी मागणी वडणे यांनी केली आहे.