तुळजापूर (प्रतिनिधी)-  तिर्थक्षेञ,तुळजापूर  शहरातील श्रीतुळजाभवानी मंदीराकडे येणाऱ्या व अन्य प्रमुख रस्त्यावरील पक्की अतिक्रमणे हटविण्याची मागणी डाँ अण्णाभाऊ साठे क्रांतीसेना  जिल्हाध्यक्ष किरण कांबळे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देवुन केली.

शहरातील बस स्थानक ते आंबेडकर चौक, भवानी रोड, महाद्वार ते कमानवेस, धाराशिव रोड तसेच महाद्वार ते शुक्रवार पेठ - पाण्याची टाकी शहरातील या प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून रस्त्यावर पक्की बांधकामे बांधण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला आहे. अरुंद स्त्यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असून भाविकासह नागरिकांना त्राससहन करावा लागत आहे. सदरील सरकारी अतिक्रमणीत रस्त्यावर दुकानदार व्यवसाय मांडुन काही मंडळी पैसे कमावत आहे. अतिक्रमणामुळे या रस्त्यावरील डिवायएसपी साहेबांची फेरीवाल्यांसाठी पट्टे मारण्याची योजना बारगळली आहे. तरी पालिकेने तातडीने या प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण भाऊ कांबळे, विलास, अण्णा गायकवाड, गोमू गवळी, योगेश कसबे, सुरज डोलारे यांच्या स्वाक्षरी आहेत.

 
Top