उमरगा (प्रतिनिधी)- डॉक्टर्स डे निमीत्त शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने उमरगा लोहारा तालुक्यातील डॉक्टरांचा संवाद व “वैद्यकीय क्षेत्रातील आव्हाने आणि सामाजिक जाणीवा” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उमरगा-लोहारा तालुक्यातील डॉक्टर्सचा सत्कार करण्यात आला.
डॉक्टर्स डे निमीत्त 1 जुलै रोजी उमरगा येथे उमरगा व लोहारा तालुक्यातील डॉक्टरांचा संवाद व “वैद्यकीय क्षेत्रातील आव्हाने आणि सामाजिक जाणीवा” या विषयावर व्याख्यान या कार्यक्रमास उमरगा-लोहारा तालुक्यातील डॉक्टर्स व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंडियन मेडिकल असोसिएशन नियोजित महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांनी उपस्थित डॉक्टर्स व नागरिकांना “वैद्यकीय क्षेत्रातील आव्हाने आणि सामाजिक जाणीवा” या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उदघाटन धाराशिव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांच्या हस्ते संपन्न झाले तर अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड होते. यावेळी युवासेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, युवतीसेना मराठवाडा निरीक्षक ॲड. आकांक्षा चौगुले, आयएमए चे अध्यक्ष डॉ.अनंत मुगळे, सचिव डॉ. एन. डी. बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ.अनिकेत इनामदार यांनी वैद्यकीय सेवा आणि अध्यात्म या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तर ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा आदर्श बनेलेल्या स्पर्श ग्रामीण रुग्णालयास वर्ष 24-25 अंतर्गत कायाकल्प व पर्यावरणपूरक सुविधामध्ये राज्यात प्रथम क्रमांक व प्राथमिक आरोग्य केंद्र येणेगूर या रुग्णालयास राष्ट्रीय स्तरावर उल्लेख पुरस्कार व कायाकल्प 24-25 अंतर्गत राज्य स्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा व तसेच नीट परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विशाल विलास शेटगार, सिद्धेश्वर संजय जाधव, सुधांशू सुनील पाटील, कु.साईनंदिनी विलास व्हटकर, कु.अदिती अशोक बनसोडे या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.वसंतराव मुगळे, डॉ.विजय पाटील, डॉ.डी.एस.थिटे, डॉ.सुभाष येळापुरे, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे रमाकांत जोशी, डॉ. एम.एम.अर्दाळे, डॉ.विजयकुमार शिंदे, डॉ.विक्रम आळंगेकर, डॉ.सिद्राम ख्याडे, डॉ.विनोद जाधव, डॉ.नचिकेत इनामदार, डॉ.अनिकेत इनामदार, डॉ.डॉ.साळुंके आर.आर. डॉ.सुवर्णा मुगळे, डॉ.फरीद अत्तार, डॉ.हरून मुजावर, ज्योतीताई चौगुले, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, ज्ञानज्योती संस्थेचे सचिव प्रदीप मदने, सचिन जाधव, योगेश तपसाळे, व्यंकट पाटील, अप्पासाहेब पाटील, शेखर पाटील, शरद इंगळे, शेखर घंटे, संदीप चौगुले, अमर शिंदे, रोहित पवार आदी जण उपस्थित होते.