धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील वाघोली गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीने पोलिसांनी दिलेल्या त्रासातून आत्महत्या केली आहे. मुलाने केलेल्या एका गुन्ह्यासाठी पोलिसांनी पीडित व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली. यावेळी पोलिसांनी शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक दिली. यामुळे अस्वस्थ झालेल्या व्यक्तीने गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना रविवार दि. 6 जुलै रोजी घडली. 

काकासाहेब खडके असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मुलगा धीरज काकासाहेब खडके हा एका चेन स्नॅचिंग प्रकरणात आरोप आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात चैन स्नॅचिंग प्रकरणी धीरज काकासाहेब खडकेसह अन्य एका आरोपीवर कलम 304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींनी एका अपंग महिलेच्या गळ्यातील चेन चोरून पळ काढला होता. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून गुन्हा दाखल केला होता. तेव्हा पासून पोलीस धीरजचा शोध घेत होते. पण त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. या प्रकरणात धीरजचा शोध घेताना पोलिसांनी त्याचे वडील काकासाहेब खडके यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांना दिवसभर पोलीस ठाण्यात चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला. तसेच चौकशी करत असताना शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक देण्यात आले एवढंच नव्हे तर पोलीस काकासाहेब यांना घेऊन त्यांच्या विविध नातेवाईकांच्या घरी गेले आणि त्या ठिकाणी आरोपी धीरजचा शोध घेण्यात आला. मुलाने केलेल्या गुन्ह्यासाठी काकासाहेब यांना मिळालेल्या या वागणुकीतून व्यथित झालेल्या काकासाहेब यांनी रविवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबतचा आरोप मयताच्या कुटुंबीयांनी केला आहे.


सरपंचाने सांगितले

वाघोली गावचे सरपंच संजय नानासाहेब खडके यांनी बार्शी पोलिसांशी संपर्क साधून मुलगा तसा नाही. जरी तुम्हाला पाहिजे असेल तर मी उपलब्ध करून देतो. त्याचे वडील  काकासाहेब खडके आजारी आहेत. त्यांना त्रास देऊ नका असे सांगितले होते. विशेष म्हणजे धीरज खडके याचे तेर येथे सबमर्सिबल पंप रिवायडींग करायचे दुकान आहे.


 
Top