उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा विधानसभा मतदारसंघातील भुकंपग्रस्त गावातील विविध समस्या, भुकंपग्रस्त आरक्षण तीन टक्के करण्याची मागणी यासह तेरणा, बेनितुरा प्रकल्प पुनर्वसनातील त्रुटी यासह अनेक प्रश्न आमदार प्रविण स्वामी यांनी विधानसभेत लावून धरली.

विधानसभेत आमदार प्रविण स्वामी यांनी विधानसभेत उमरगा मतदारसंघाताल विविध मागण्या केल्या. सप्टेंबर 1993 मध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंपात उमरगा व लोहारा तालुक्यातील अनेक गावे क्षतिग्रस्त झाली. त्यापैकी 37 गावांचे पुनर्वसन शासन व इतर स्वयंसेवी संघटनेच्या वतीने करण्यात आले. लोहारा तालुक्यातील माकणी धरण व उमरगा तालुक्यातील बेनितुरा प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या अनेक गावांचे पुनर्वसन शासनाच्या वतीने करण्यात आले. 30 ते 40 वर्षापूर्वी झालेल्या या पुनर्वसनात अनेक त्रुटी दिसून येतात. यामध्ये पुनर्वसन क्षेत्रातील लाभधारकांना  वाटप केलेल्या भूखंडाचे कबाले अद्याप दिले गेलेले नाहीत. भूकंपग्रस्ताचे दोन टक्के आरक्षण मर्यादा वाढवून तीन टक्के करण्याची मागणी शासन स्तरावर प्रलंबित आहे. लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्द या गावाचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु येथील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र व कबाले अद्याप वाटप केलेले नाहीत. लातूर व धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, लोहारा, औसा व निलंगा या तालुक्यातील निम्न तेरणा प्रकल्पाचे डावा व उजवा कालवे जातात या कालव्याच्या बाजूचे रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून विकसित करण्यात यावेत. भूकंपग्रस्तांचे आरक्षण इतर प्रवर्गातील किंवा बाहेर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना देण्यात येऊ नये. अशी मागणी आमदार प्रविण स्वामी यांनी विधानसभेत केली.

 
Top