तुळजापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या विरोधात घडलेल्या घटना पक्षाने गंभीरपणे घेतल्या आहेत. अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.

प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व रुपालीताई चाकणकर या सोमवार दि. 21 जुलै रोजी देवीदर्शनार्थ आली असता मराठा क्रांती मोर्चा व छावा संघटनेच्या पदाधिकारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी यांनी बैठक घडवुन आणली. यावेळी अर्जून सांळुके, महेश गवळी, अजय सांळुके, कुमार टोले या पदाधिकारी यांनी सुरज चव्हाण व माणिकराव कोकाटे यांना पदमुक्त करण्याची मागणी केली. या वेळी बोलताना तटकरे म्हणाले कि, उपमुखमंञी अजित पवार यांनी कोकाटेंना पूर्वीही वादग्रस्त वक्तव्यांबद्दल समज देत आले आहेत. राजकर्त्यांनी संयम राखणे गरजेचे असते. कृषीमंञ्यांनी शेतकऱ्यां संबंधित कामात लक्ष घालणे गरजेचे असते. पक्ष आता पदाधिकाऱ्यांकडून संयमित वर्तनाची अपेक्षा ठेवत आहे आणि सर्व संबंधित प्रकरणांची गांभीर्याने दखल घेतली आहे. सध्याच्या परिस्थितीत, राष्ट्रवादी काँग्रेसवर दोन्ही नेत्यांच्या वर्तनाविरोधात तिव्र विरोध होत असून पक्ष नेतृत्वाने सर्व घटना गंभीरपणे घेतल्या असल्याचे स्पष्टपणे नमूद केले.


 
Top