तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील ऐका पासष्ट वर्षिय महिलेचा खुन झाल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. 21 जुलै रोजी उघडकीस आली आहे. शहरातील चित्रा पाटील वय 65 या महिला बेपत्ता होत्या. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला. सोशल मीडियावर पोस्ट्स केल्या. मात्र काहीच ठावठिकाणा लागला नाही. अखेर तुळजापूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी शोध सुरू केला होता. चौकशीत एका संशयित आरोपी ओम निकम (वय 30, रा. तुळजापूर) याला पोलिसांनी विचारणा केली होती, मात्र सुरुवातीला त्याने कोणतीही माहिती दिली नव्हती.
मात्र 29 जुलैच्या रात्री अचानक आरोपी ओंकार निकम याने गुन्हयाची कबुली दिली. त्यानेच चित्रा पाटील यांचा खून केला आहे. ही धक्कादायक माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले. सोलापूर-धाराशिव बायपास रोडवरील एका पुलाखाली झाडीझुडपात मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख चित्रा पाटील अशी पटली. ज्यामुळे खून पूर्वनियोजित आणि अत्यंत क्रूरपणे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खूनाचा नेमका उद्देश काय होता, हे शोधण्यासाठी तपास अधिक खोलात सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे, पोलीस उपनिरीक्षक अनिल धनुरे, विजय थोटे, हेड कॉन्स्टेबल महादेव राऊत, कॉन्स्टेबल वैभव देशमुख, गोवर्धन माने, सुरज चांदणे आणि उद्धव गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी आरोपी ओंकार निकम याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.