धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे विज्ञान विभागाचे डॉ संदीप देशमुख हे प्रभारी प्राचार्य पदी रुजु झाले असुन महाविद्यालयीन प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचा उत्साहात सत्कार समारंभ आयोजित केला होता,सत्कारास उत्तर देताना प्र प्राचार्य डॉ संदीप देशमुख म्हणाले की,आपणांसर्वांना विद्यार्थी केंद्र बिंदू मानून कार्य करावे लागेल, महाविद्यालयात आल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी लागेल, नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन आव्हाने आपल्या समोर आहेत त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये विज्ञान शाखेत त्यांची पीएच.डी. रसायनशास्त्रा मध्ये सिंथेसिस अँड स्टडी ऑफ ट्रान्जीशन मेटल अँड नॉन मेटल डोपड टीआयओटू नॅनो पार्टीकल्स या विषयामध्ये झाली आहे.
तसेच समन्वयक, डी बी टी स्टार कॉलेज स्कीम, ज्या अंतर्गत महाविद्यालयास स्टार कॉलेज चा दर्जा मिळाला व 82 लक्ष रुपयाचे अनुदान मिळवून दिले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात स्टार कॉलेज चा दर्जा मिळवणारे हे पहिले व एकमेव महाविद्यालय आहे.त्याचप्रमाणे विद्यापीठ स्तरावर अभ्यास मंडळ सदस्य, रसायनशास्त्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर जिल्हा समन्वयक, विद्यार्थी विकास मंडळ व जिल्हा समन्वयक, आविष्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर म्हणून उत्कृष्ट कार्याची नोंद त्याचप्रमाणे सल्लागार समिती सदस्य, युवक महोत्सव 20242025, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ्त्रपती संभाजीनगर तर संचालक श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर , तसेच विभागीय चेअरमन,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर, मराठवाडा विभागीय कार्यालय, धाराशिव त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या विविध समित्यांवर अतिशय प्रभावीपणे कार्य केल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.तर इतर शैक्षणिक बाबींमध्ये एक लघु संशोधन प्रकल्प पूर्ण व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये शोध निबंध प्रसिद्ध आहे, महाविद्यालय स्तरावर सहाय्यक समन्वयक, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष म्हणून कार्य करत असताना महाविद्यालयास नॅकच्या चौथ्या साइकल च्या मूल्यांकनात सी जी पी ए 3.23 सह ‘अ' दर्जा मिळाला.त्यांच्या या सर्व कार्याचा व अनुभवाचा महाविद्यालयाच्या विकासासाठी नक्कीच फायदा होईल तसेच यावेळी त्यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सचिवा शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख यांचे मनस्वी आभार मानले,सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ बालाजी गुंड यांनी केले. तर आभार प्रा सचिन चव्हाण यांनी मानले, यावेळी कनिष्ठ, वरीष्ठ विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.