कळंब (प्रतिनिधी)- अनादी काळापासून समाज मनावर संस्काररुपी विचारांची पेरणी केल्यामुळे थोर युग पुरुष निर्माण झाले.मात्र काळाच्या ओघात बिघडत चाललेल्या समाजाला खऱ्या अर्थाने आता सद्गुरूच्यां विचारांची गरज आहे. त्याशिवाय सामान्य माणसाला जीवनात मुक्ती मिळणार नाही, असे प्रतिपादन हभप. गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले यांनी डिकसळ येथे गुरुवारी गुरु पोर्णिमेंनिमित्त आयोजित भव्य-दिव्य पारंपारिक गुरुमंत्र व गोपाळ काल्याच्या कीर्तनसेवेच्या प्रसंगी केले.
डिकसळ येथे दरवर्षी पारंपारिक गोपाळ काल्याचे आयोजन केले जाते. सकाळी गावातून दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. त्यानंतर मारुती मंदिरासमोर पारंपरिक भारुडाचा कार्यक्रम पार पडला. तर दुपारी दोन ते चार यावेळेत गुरुवर्य हभप प्रकाश महाराज बोधले यांचे काल्याच्या कीर्तन झाले.
कीर्तनानंतर उपस्थितांना काला वाटप करण्याचा मान असलेले मानकरी विशाल महाराज बोधले यांना खास पद्धतीने गोपाळ गड्यानी खांद्यावर घेतले. त्यानंतर डोक्यावर काल्याची हंडी घेऊन भाविकांना गोपाळ काल्याच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थानचे उत्तराधिकारी हभप. परमेश्वर महाराज बोधले, हभप बाळासाहेब महाराज बोधले हभप. अण्णा महाराज बोधले, रामेश्वर महाराज बोधले, विजय बोधले, नवनाथ महाराज अंबिरकर, अशोक काटे, नामदेव काळे, किरण कदम, वैजिनाथ जाधव, रामदास काळे, संजय काटे, डिगांबर खंदारे, सौदागर काळे, समाधान जाधव, भागवत कदम, अनंत अंबिरकर,नामदेव काटे, विलास महाराज बोधले, मुकुंद बोधले, जयदीप बोधले, कुलदीप बोधले, सचिन बोधले आदि तरुण मंडळी व ग्रामस्थांनी विशेष परीश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी बीड, लातूर, नगर, सोलापूरसह पंचक्रोशितील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेकडो भाविकांनी घेतला गुरुमंत्र
राज्याच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या हजारो भाविक भक्तांनी येथील श्रीगुरू रामचंद्र बोधले महाराज यांच्या पवित्र समाधीचे दर्शन घेत हभप. गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले व संस्थानचे उत्तराधिकारी परमेश्वर महाराज बोधले यांच्या कडुन गुरुमंत्र घेतला. सकाळी आठ वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी व गुरुमंत्र घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी संस्थांच्यावतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.