धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील रहिवाशी उमाकांत लक्ष्मणराव माळाळे हे धाराशिव पोलीस दलातून सहाय्यक पोलीस फौजदार पदावरून नियत वयोमानानुसार निवृत्त झाले आहेत. त्यानिमित्त प्रभारी पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक व सहपरिवार सत्कार करून निरोप देण्यात आला.

उमाकांत लक्ष्मणराव माळाळे हे धाराशिव पोलीस दलात 1993 साली कर्तव्यावर रूजू झाले. त्यांनी ढोकी, कळंब, लोहारा, तुळजापूर, नळदुर्ग आणि धाराशिव पोलीस मुख्यालयात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले आहे. त्यांची दोन मुले इंजिनिअर तर एक डॉक्टर आहे. त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह माळाळे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.


 
Top