धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत तुळजापूर व धाराशिव विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. दोन्ही मतदारसंघांतील एकूण 23 जिल्हा परिषद गट व दोन नगरपरिषद क्षेत्रांचा समावेश असून, आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक दृष्टिकोनातून नियोजनावर भर देण्यात आला.
तुळजापूर तालुक्यातील विविध भागांसाठी निरीक्षक नेमण्यात आले असून, तुळजापूर नगरपरिषदेसाठी शिवाजी कोळेकर यांची नियुक्ती झाली. धाराशिव तालुक्यासाठीही निरीक्षकांची नियुक्ती निश्चित करण्यात आली असून आंबेजवळगा, तेर, करजखेडा, सारोळा, कारी या भागांसाठी सचिन देवकते, बेंबळी व सांजा साठी अशोक पानढवळे, ढोकी व येडशीसाठी विलास वाघमारे, केशेगाव व पाडोळी साठी वसंत कस्पटे, कोंडसाठी रोहित काटकर, पळसपसाठी सचिन कोळेकर तर उपळ्यासाठी सोमनाथ धायगुडे यांची नियुक्ती करण्यात आली. धाराशिव नगरपरिषदेसाठी सुहासिनीताई पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.
बैठकीला शिवाजी बुवा गावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह अश्रुबा कोळेकर, सुहासिनीताई पाटील, सचिन देवकते, अशोक पानढवळे, शिवाजी कोळेकर सर व इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीचे वातावरण उत्साही असून, कार्यकर्त्यांनी निवडणुकीत सक्रिय भूमिका बजावावी असा संदेश या बैठकीतून देण्यात आला.