कळंब (प्रतिनिधी)- येथील बस स्थानकाची स्वच्छतेबाबतची उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक 5 अमरावती यांच्या समिती मार्फत दि. 31 जुलै रोजी तपासणी करण्यात आली.
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता मोहिमेअंतर्गत कळंब बस स्थानकाची स्वच्छतेबाबतची तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणी समितीमध्ये उप महाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक 5 आमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली या तपासणीमध्ये विविध विभागांना भेटी देण्यात आल्या व बस स्थानक स्वच्छता ,प्रवाशांना पिण्याचे पाण्याचा व्यवस्था ,त्याचबरोबर गाड्यांची पार्किंग, सुलभ शौचालय, बस स्थानकाची रंगरंगोटी आदी बाबी तपासण्यात आल्या. या नियंत्रण समितीमध्ये आमरावती विभागाचे उपमहाव्यवस्थापक रोहन पलगे , प्रादेशिक संख्याकी अधिकारी राकेश पवार, प्रवासी मित्र संघटनेचे प्रा. मोहन जाधव, कळंब तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक यांनी या समितीमध्ये काम पाहिले. यावेळी समितीने सर्व परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांचा आगार प्रमुख एस. डी. खताळ यांचे कौतुक केले या स्वच्छता मोहीम तपासणीसाठी आगार प्रमुख एस. डी. खताळ, वाहतूक निरीक्षक निलेश जाधव, सहाय्यक वाहतूक निरीक्षक अभिजीत धाकतोडे,कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती, विलास जाधव, वाहतूक नियंत्रक चेतन गोसावी, हनुमंत मुंडे, ए.वाय.पठाण, गोविंद जाधवर सह आदी नी परिश्रम घेतले.