नळदुर्ग (प्रतिनिधी)- आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी नळदुर्ग येथे धावती भेट देऊन शहरांमध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करून संबंधित ठेकेदारांना लवकरात लवकर कामे पूर्ण करून घेण्याची सूचना दिली. दरम्यान नळदुर्ग मध्ये येत्या डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय पातळीवरील नळदुर्ग फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
रविवार दिनांक 13 जुलै रोजी तुळजापूर विधान सभेचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दुपारच्या वेळी नळदुर्ग शहराला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी नळदुर्ग शहराला नवीन पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या कामावर भेट दिली. दरम्यान नवीन बांधण्यात येत असलेले जलशुद्धीकरण केंद्राची यावेळी त्यांनी पाहणी केली. येत्या 26 जानेवारी 2026 पर्यंत संबंधित ठेकेदारांनी त्यांना पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी नळदुर्ग बायपास हायवेच्या कामाची त्यांनी पाहणी केली असून नळदुर्ग तुळजापूर रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस तयार करण्यात येत असलेल्या सर्विस रस्त्याच्या कामाची पाहणी करून ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी कंपनीचे बालाजी गायकवाड यांना आदेशित केले. त्याचबरोबर नळदुर्गच्या गोलाई चौकातील वसंतराव नाईक स्मारकाच्या कामाची पाहणी केली. याशिवाय शहरातील शादी खाना बांधकामाची त्याचबरोबर बुद्ध विहार येथील बांधण्यात येत असलेल्या सभागृहाच्या कामाची ही त्यांनी पाहणी करून समाधान व्यक्त करून लवकर काम पूर्ण करण्याचे संबंधित ठेकेदारांना सूचित केले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, नळदुर्ग शहर भाजपाचे अध्यक्ष बसवराज धरणे, भाजपाचे सुशांत भूमकर, दीपक आलुरे, साहेबराव घुगे, माजी नगरसेवक नयर जहागीरदार, विलास राठोड, विजय शिंगाडे, धीमाजी घुगे, सुधीर हजारे, माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, निरंजन राठोड, पिंटू नळदुर्गकर, अक्षय भोई, संजय विठ्ठल जाधव, बबन चौधरी, सिकंदर काझी , रिझवी यांच्या सह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
यावेळी पाणी पुरवठ्याच्या कामाची पाहणी करीत असताना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी बोलताना म्हटले की, येत्या डिसेंबर महिन्यामध्ये नळदुर्ग मध्ये राष्ट्रीय पातळीवरील नळदुर्ग महोत्सवाचे (फेस्टिव्हल ) आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले, त्यामुळे नळदुर्ग व परिसरातील ग्रामीण भागातील त्याचबरोबर जिल्ह्यातील कलाकारांसाठी नळदुर्ग महोत्सव हे पर्वणी ठरणार आहे.