उमरगा (प्रतिनिधी)- दिनांक 19 जुलै 2025 रोजी हरित धाराशिव अभियान “ एक पेड माँ के नाम“ अंतर्गत सीड फॉर्म उमरगा, येथे महावृक्ष लागवड अभियान नगरपरिषद उमरगा व रोटरी क्लब उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन उमरगा लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जाधवर, रोटरी चे माजी प्रांतपाल डॉ. दीपक पोफळे, निसर्गप्रेमी ग्रुपचे डॉ. उदय मोरे, डॉ. सातपुते, रोटरी क्लब उमरगा चे अध्यक्ष प्रा. डॉ. धनंजय मेन कुदळे, सचिव प्रा. राजू जोशी,,डॉ.विक्रम आळंगेकर, कमलाकर भोसले , सतीश साळुंके,शिवशंकर वंडरे, जि प प्रशाला उमरगाचे मुख्याध्यापक मोरे सर, तसेच विविध शाळेतील शिक्षक गावातील प्रतिष्ठित मंडळी ज्येष्ठ नागरिक मुरलीधरराव मुगळीकर, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी महा वृक्ष लागवड कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. याप्रसंगी माननीय आमदार प्रवीण स्वामींनी वृक्ष लागवड किती महत्त्वाची आहे ती एक काळाची गरज आहे पर्यावरणाचे संतुलन राखणे ही तुमची आमची जबाबदारी आहे ज्या ठिकाणी आज वृक्ष लागवड होत आहे सभोवतालच्या नागरिकांनी या वृक्षांची काळजी घेणे गरजेचे आहे याप्रसंगी सर्वांनी वृक्ष लागवडीची शपथ घेतली.