उमरगा (प्रतिनिधी)- रोटरी क्लब उमरगा, यांचा पदग्रहण समारंभ दिनांक 17 जुलै रोजी सायंकाळी सात वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने व दीपप्रज्वलन करून करण्यात आली या सत्कार सोहळ्याला रोटे. क्षितिज झावरे (डी. जी. एन. 27- 28), अहिल्यानगर रोटे. पी. के. मुंडे (ए. जी. 25- 26) उपप्रांतपाल, धाराशिव, रो. डॉ. दीपक जी पोफळे (माजी प्रांतपाल), उमरगा प्राचार्य डॉ. राम सोलंकर, आदर्श महाविद्यालय, उमरगा, प्रमुख अतिथी, श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे, सचिव मा. रामकृष्णपंत खरोसेकर, रो. रवींद्रजी बनकर, ईश्वर व्होरा, रोटरी क्लब धाराशिव चे अध्यक्ष रो. रणदिवे सर, मुरूम रोटरी क्लब चे सर्व पदाधिकारी, मा. प्राचार्य दिलीपजी गरुड सर, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. क्षितिज झावरे यांनी आपल्या रोटरी चा जीवन प्रवास ते आज पर्यंत रोटरीने मला मान, प्रतिष्ठा ,सन्मान, आपुलकी प्रेम रोटरी मुळे मला मिळाल्या दुःखद प्रसंग आला तरी त्यातून खचून न जाता आपण आपले कार्य सतत चालू ठेवले पाहिजे.“वडील“ प्रत्येकाच्या जीवनात किती महत्त्वाचा घटक असतो हे माझे वडील गेल्यानंतर मला समजले. डॉ. पोपळे साहेबांनी“ दहा मिनिटाचा सहवास“ किती महत्त्वाचा असतो हे त्यांनी अतिशय कल्पकतेने श्रोत्यांना ऐकून मंत्रमुग्ध केले. नूतन अध्यक्ष यांनी आगामी काळात विविध योजना राबवण्याचा संकल्प सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. संजय देशमुख यांनी केले. माननीय आमदार प्रवीण स्वामी चा विधिमंडळातून दिलेला संदेश सर्वांना ऐकविला कार्यक्रमाचे आभार क्लबचे सचिव प्रा. राजू जोशी यांनी मानले कार्यक्रमानंतर सुरुची भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला.