धाराशिव (प्रतिनिधी)-“ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी...भेटीत तृष्टता मोठी...”या काव्याला सार्थ ठेवत आज (दि.13 जुलै 2025) धाराशिव शहरातील भारत विद्यालय, तालिम गल्ली येथील सन 1990 ते 2000 या कालावधीतील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा राजगड फंक्शन हॉल येथे संपन्न झाला. या स्नेहमेळाव्याच्या सुरूवातीला मान्यवर शिक्षकांचे माजी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात व गहिवरलेल्या सूरात स्वागत व सत्कार केला.

या स्नेहमेळाव्याचे अध्यक्षस्थान माजी मुख्याध्यापक श्री.चोंदे सर यांनी भूषविले. तर व्यासपीठावर माजी मुख्याध्यापक आबदारे सर, चव्हाण सर, पवार, बुरगुटे सर, कांबळे सर, मस्तुद मॅडम, हाजगुडे-शिनगारे मॅडम, क्षीरसागर सर यांची उपस्थिती होती.  तसेच 2000 साली दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी मुख्याध्यापक आबदारे सर तसेच श्री.पवार सर, चव्हाण सर, बुरगुटे सर, कांबळे सर, मस्तुद मॅडम यांनी आजपर्यंतचा आढावा घेताना नामांकित शाळेच्या तुलनेत आज आमचे विद्यार्थी कुठेही कमी राहिले नाहीत याचे समाधान व्यक्त केले. तसेच सध्या मोठ्या व उच्च पदावर असलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतूकही केले. त्याबरोबर जे व्यवसाय करतात त्यांचाही उत्साह वाढावा असे मार्गदर्शन मान्यवर शिक्षकांनी केले.

यावेळी माजी विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने आपली मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी अनुभवलेला प्रवास आणि सध्याची परीस्थिती याविषयी अतिशय मनोरंजक शैलीने सादरीकरण करून उपस्थितांना मनमुराद हसविण्याचा आनंद दिला. हा स्नेहमेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतलेले सचिन मोरे, संतोष क्षीरसागर, कालिंदा देशमुख व रेश्मा दंडगुले यांचा मान्यवर शिक्षकांच्या हस्ते खास कौतुक करण्यात आले. मन तृप्त करणाऱ्या भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.  

 
Top