धाराशिव (प्रतिनिधी)- रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करणाऱ्या सामाजिक संस्था, स्वेच्छेने रक्तदान करणारे रक्तदाते यांच्या सन्मानार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिवच्या वतीने रक्त संक्रमण विभागाकडुन दखल घेतली जाते. या कार्यक्रमात फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धाराशिव संचलित फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महामानवाचा जयंती महोत्सवात रक्तदान शिबिराचे आयोजन करुन महामानवाला अभिवादन करण्यात आले होते. यानिमित्त समितीला गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी लाकाळ, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गंगासागरे, अधिसेविका सुमित्रा गोरे, इंचार्ज प्रमिला निंबाळकर, रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतीफ, इथिकल कमिटी सदस्य गणेश वाघमारे, आरोग्यमित्र शेख रौफ ब्रदर, रक्त संक्रमण अधिकारी विठ्ठल कांबळे, गणेश साळुंखे, तसेच फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीचे अध्यक्ष गणेश वाघमारे, उपाध्यक्ष संजय गजधने, सचिव प्रवीण जगताप, कोषाध्यक्ष अंकुश अण्णा उबाळे, सदस्य मार्गदर्शक संपतराव शिंदे, डॉ.रमेश कांबळे, बलभीम कांबळे, सदस्य बाबासाहेब गुळीग, प्रदीप पांढरे, नामदेव वाघमारे, विष्णु इंगळे, विशाल घरबुडवे यांचे प्रतिनिधी सह इतर सामाजिक संस्था,जयंती मंडळ शिबिराचे आयोजक व रक्तदाते यांचाही सन्मान करण्यात आला. डॉक्टर सिस्टर कर्मचारी उपस्थित होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. संतोष पोतदार यांनी सुत्रसंचलन केले. तर आभार अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चव्हाण यांनी मानले.