धाराशिव (प्रतिनिधी)- आज धाराशिव येथे रुपामाता शिक्षण संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध शाळांची संयुक्त बैठक संस्थेचे अध्यक्ष ॲड व्यंकट गुंड यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे पार पडली. या बैठकीस रुपामाता प्राथमिक विद्यालय धाराशिव, इरा इंटरनॅशनल स्कूल धाराशिव, रुपामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पाडोळी (आ) तसेच संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लासोना या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, क्लार्क व सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक वर्ष 202526 ची व्यापक तयारी, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नविन उपक्रम, शिक्षक प्रशिक्षण, तंत्रज्ञान वापर, तसेच शाळांतील शिस्त व नियोजन या बाबींवर सविस्तर चर्चा झाली.
संस्था विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे आणि या बैठकीद्वारे शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कार्य करण्याचा संकल्प पुन्हा एकदा दृढ करण्यात आल्याची माहिती ॲड व्यंकट गुंड यांनी केली.