भूम (प्रतिनिधी)- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 6 जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले दुर्गराज रायगड येथे शिरकाई देवीच्या गोंधळाचा व मंदिर  सजावटीचा ,शिवभक्त  मान भूम तालुक्यातील श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठानला मिळाला.असून आज 450 शिवभक्त रायगड साठी भूम मधून रवाना झाले .

कोल्हापूर येथील छत्रपती संभाजी महाराज भोसले यांच्या सहचारिणी आईसाहेब संयोगिता राजेभोसले यांच्या आदेशाने हा मान दरवर्षी श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठानला मिळतो.

किल्ले रायगड येथे हजारो मावळ्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन होतो. या कार्यक्रमात भूम येथील श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठानच्या वतीने शिवभक्त नियंत्रण पथक साईनाथ असते. तसेच किल्ले रायगडावर परिसर स्वच्छता करण्यात येते. आरास करण्यासाठी लागणारी विविध फुले पुणे येथून आणण्यात आली होती. या शिवराज्याभिषेक आयोजन शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज किल्ले रायगडच्या माध्यमातून करण्यात येतो. श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठानच्या या कामाचे छत्रपती संभाजी महाराज यांनी विशेष कौतुक केले. यामध्ये प्रतिष्ठानचे संस्थापक विठ्ठल बाराते, शुभम पवार, तेजस औताडे, अनिकेत आकरे, ऋतुराज खानविलकर, अभिजित सुरवसे, आनंद गाढवे, अभिषेक कराळे, प्रसाद कराळे, गौरव बोराडे, शाहू गुंड, अशोक साळुंके, शिवप्रताप गुंड, अक्षय मांगले, आशिष चव्हाण, मार्तंड देशमुख, सौरभरेंगे, अभिषेक पाटील, शंतनू माळी, सार्थक गाढवे, स्वप्नील औताडे, गणेश भोळे, राम कुंभार, सुधीर देशमुख, ओंकार पवार यांच्यासह पदाधिकारी रवाना झाले आहेत.


 
Top