तुळजापूर (प्रतिनिधी)- अंबरनाथ (जि. ठाणे) येथील राकेश परशुराम दलाल यांनी सोमवार दि. 16 जून रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला 55 इंची आकाराचे पाच गुगल अँड्रॉईड टीव्ही दान म्हणून प्रदान केले. 

उपविभागीय अधिकारी तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त ओंकार देशमुख यांच्या हस्ते दलाल यांना श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा, कवड्याची माळ व महावस्त्र देण्यात आले. यावेळी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे, लेखापाल सिद्धेश्वर इंतुले, जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, नागेश शितोळे, ओंकार काटकर, सहायक सुरक्षा निरीक्षक श्रीकांत पवार व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

 
Top