तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे जे कामे नगरपरीषद  ने करावयाची असतात अशी कामे करण्यास नगरपरीषद संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने अखेर ही कामे स्वखर्चाने माजी नगरसेवक करीत असल्याने नगरपरीषद ढिसाळ बेजबाबदार कारभार शहरवासियांन समोर येत आहे.

तुळजापूर नगरपरीषद मध्ये प्रशायक राज हे अधिकारी राज बनले असुन हम करसो काम अशा पध्दतीने अधिकारी काम करीत आहेत. या अधिकाऱ्याने  नवख्या वरिष्ट अधिकाऱ्यास मुठीत ठेवल्याची चर्चा आहे. नगरपरीषद बांधकाम विभागाचा कारभार शहरवासियांसाठी सर्वृत आहे. 

नालीवर टाकण्यात येणारे  लोखंडी झाकणे, सिमेंट चेंबर ते नगरपरीषद  बाबतीत  किती टाकतात, सतत सिमेंट व लोखंडी नव्याने टाकले जात असल्याने   हा शोधाचा विषय आहे. शहरातील वर्दळीचा भागातील चेंबर टाकले कि  फुटतात व लोंखडी झाकणे खराब होतात. जर चांगले दर्जाचे टिकाऊ टाकले तर,ते जास्त दिवस टिकतील पण लोंखडी चेंबर व झाकणे किती टाकतात याचा हिशोब नाही. खराब झालेल्या चेंबरची वृत्तपञात बातमी येताच  नगरपरीषद  बांधकाम विभाग जागा होतो व नव्याने टाकतो. टाकलेल्या लोंखडी चेंबर व लोंखडी झाकणे याचा दर्जा किंमत व किती टाकले गेली याची चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.

प्रभाग क्रमांक चार  मंकावती गल्ली हा भाग  जुन्या शहरातील श्रीतुळजाभवानी मंदीर लगत गल्लीबोळाचा आहे. येथे भाविकांचा वावर मोठा आहे. येथील  नाली वरील चेंबर खराब झाले होते व काही चेंबर चोरी गेले होते. राञी लाईट गेल्यास चालण्यास हा भाग धोकादायक ठरत होता. संभाव्य जिवित हानी घडु नये याची दक्षता  नगरपरीषद ने घेणे गरजेचे असताना ती न घेतल्याने  अखेर येथील माजी नगरसेवक यांनी  मागील पाच वर्षापासुन  मंकावती गल्ली येथील नालीवर 25 ठिकाणी स्वखर्चाने नगरसेवक सुनील रोचकरी यांनी चेंबर बसवले आहेत. त्याचप्रमाणे आताही स्व खर्चाने मकावती गल्ली येथे नवीन चेंबर बसवण्यात आले.

 
Top