तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयास मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा स्पर्धेत पुरस्कारासाठी धाराशिव तालुक्यातून पात्र ठरली असून शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता खाजगी शाळासाठी तालुकास्तरीय तृतीय क्रमांक पटकावून बक्षिसाची मानकरी ठरली आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये भाग घेत तेरच्या महाराष्ट्र संत विद्यालयाने मूल्यांकनामध्ये सरस गुण मिळवून पुरस्कारासाठी प्रयत्न केले होते. शाळेच्या या प्रयत्नास यश मिळाले असून तालुकास्तरावर सदर शाळा तृतीय क्रमांकावर स्थान प्राप्त करून पुरस्काराची मानकरी ठरली. पुरस्काराच्या रकमेचा एक लाख रुपयांचा धनादेश गटशिक्षणाधिकारी सय्यद असरार अहेमद यांच्या हस्ते प्राचार्य बेदरे जे.के. यांनी स्वीकारला. यावेळी जेष्ठ विस्तार अधिकारी बापू शिंदे, वरिष्ठ लिपिक ताडकर, पर्यवेक्षक पाटील एस. एस., सहशिक्षक बळवंतराव एस. एस. उपस्थित होते. या पुरस्कारासाठी तेर बीटचे विस्तार अधिकारी तोडकर व केंद्रप्रमुख पडवळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर पुरस्कारासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष टी. पी. शिनगारे, उपाध्यक्ष अविनाश पाडुळे यांनी सहकार्य केले. या यशाबद्दल शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी.टी.पाटील, खजिनदार शितोळे जयकुमार, जॉईंट सेक्रेटरी अरुण देबडवार यांनी शाळेचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या.