परंडा (प्रतिनिधी)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची  “त्रिशताब्दी“ जयंतीदिनी भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते भाजपा संपर्क कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, परंडा येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. जहिर चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, जिल्हा चिटणीस सुजित परदेशी, न.प. माजी गटनेते सुबोधसिंह ठाकूर, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, ओ.बी.सी. मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲड. तानाजी वाघमारे, ओ.बी.सी. मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव पाडुळे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, ता. उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, सरचिटणीस धनाजी गायकवाड, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष तुकाराम हजारे, श्रीमंत शेळके, डॉ. अमोल गोफणे, लक्ष्मण गोरे, तुषार नेटके, अर्जुन कोलते, रामदास गुडे, जयंत सायकर, राहुल फले, किरण कवटे, विठोबा मदने, पांडुरंग मुसळे, धनंजय काळे, गौरव पाटील, सुरज काळे, सिध्दीक हन्नुरे, तुषार कोळेकर, समाधान कोळेकर, आकाश मदने, अमर ठाकूर, नागेश मदने, आप्पासाहेब मदने, अजिम हन्नुरे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top