भूम (प्रतिनिधी)- अहिल्यादेवी न्यायप्रिय,आदर्श प्रशासक, समाज सुधारक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. भारतीय जनता पार्टी कार्यालयात 300 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
शनिवार दि. 31 मे 2025 रोजी भाजप भूम तालुका कार्यालयात राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली . यावेळी भारतीय जनता पार्टी परांडा विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर, तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर, ता.उपाध्यक्ष हेमंत देशमुख, अ.जा.मोर्चा ता.अध्यक्ष प्रदीप साठे, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, यूवा नेते आबासाहेब मस्कर, व्यापारी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गवळी, मुंकुद वाघमारे, सिद्धार्थ जाधव, ता.प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, सुब्राव शिंदे, अकाश शेटे, अशोक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सौ. लताताई गोरे, महिला ता. अध्यक्ष स्वातीताई तनपूरे, उषा आसलकर, सौ.वर्षा वीर, शुभांगी देशमुख, विद्या खामकर, सविता जाधव, रोहिनी लोंखडे आदिची उपस्थिती होती.