तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे बंद शासकीय गोडावुन आडुशाला गांजा ओडणा-या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सदरील कारवाई शुक्रवार दि. 30 मे रोजी केली.

या बाबतीत अधिक माहीती अशी कि, मल्लिनाथ रघुनाथ हजारे, वय 30 वर्षे, रा. मंगरुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी शुक्रवार दि.30.05.2025 रोजी 20.30 वा. सु. तुळजापूर शहरातील बंद पडलेल्या शासकीय गोडवून च्या आडूशाला तुळजापूर येथे गुंगीकारक गांजा पदार्थ चिलीम मध्ये भरुन सेवन/ ओढत असताना तुळजापूर पोलीसांना मिळून आला. तसेच अजय राजेंद्र बनसोडे, वय 27 वर्षे, रा. मातंग नगर शुक्रवार पेठ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.30.05.2025 रोजी 21.30 वा. सु. तुळजापूर शहरातील बंद पडलेल्या शासकीय गोडवूनच्या आडूशाला तुळजापूर येथे गुंगीकारक गांजा पदार्थ चिलीम मध्ये भरुन सेवन/ ओढत असताना तुळजापूर पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 कलम 27 अन्वये तुळजापूर पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.


 
Top