धाराशिव (प्रतिनिधी)-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त धाराशिव शहरातील प्रतिष्ठान भवन येथे महिला मेळावा व महिला आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमांना महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जयंती उत्सव समितीचे जिल्हा संयोजक इंद्रजित देवकते, सहसंयोजक राजसिंह राजेनिंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात प्रमुख वक्त्या पैठण येथील रेखाताई कुलकर्णी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास उलगडून सांगत त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याची ओळख करुन दिली. तसेच उपस्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी महिला मोर्चा अध्यक्ष नंदाताई पुनगडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मीनाताई सोमाजी - कदम, जिल्हा चिटणीस वनिता कटाळे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य उषा यरकळ, अंजली बेताळे, विद्या माने, कळंब तालुकाध्यक्ष छाया बोंदर, अहिल्या सखी मंच अध्यक्ष शैलजा कुलकर्णी, जयश्री तेरकर, प्रमिला बावकर, मनीषा वाघमारे, महिला जिल्हा उपाध्यक्ष संगीताताई थोरात तसेच अहिल्या सखी मंच मधील सदस्य करडे, शितल देवकते, रेखा जेवळीकर, काकडे, ॲड. विद्या वाघमारे, सोनाली होळकर, ॲड. विमल कस्पटे, सुमित्रा गोरे, मीना खटके, अर्चना मैंदाड, सुवर्णा कोकणे यांच्यासह अहिल्या सखी मंचच्या महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.