कळंब (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) ने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 राजपत्रित वर्ग 'अ' आणि वर्ग 'ब' या पदाकरिता परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेमध्ये खेळाडूंसाठी काही पदे आरक्षित होती. या परीक्षेसाठी परीक्षार्थी सचिन अनंत शिंदे रा. कोथळा जि. धाराशिव यांनी अर्ज भरला होता. सदरील परीक्षेमध्ये परीक्षार्थी  सचिन अनंत शिंदे यांना ओपन स्पोर्ट गट ब या गटातून अर्ज केला होता. त्यामध्ये त्यांना 92.5 मार्क मिळाले. व सदरील परीक्षेचा कट ऑफ 90 लागला. परंतु परीक्षा पास होऊनही सचिन शिंदे या विद्यार्थ्याला पूर्व परीक्षेमध्ये खेळाडू प्रवर्गातून आरक्षण असताना सुद्धा  त्या प्रवर्गाचा विचार न करता चुकीच्या कॅटेगिरी मध्ये टाकून अपात्र करण्यात आले होते.

या अपात्रतेच्या प्रकरणा विरोधात नाराजी व्यक्त करत सचिन शिंदे यांनी ॲड. पंकज सुर्यकांत कोकणे यांच्या मार्फत महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (MAT), छत्रपती संभाजी नगर येथे  याचिका क्रमांक OA/454/2025 प्रकरणदाखल  केले होते. त्यामध्ये  09 मे रोजी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (MAT), छत्रपती संभाजीनगर यांनी ॲड. पंकज कोकणे  यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सचिन शिंदे यांचा खेळाडू प्रवर्गात विचार करून एमपीएससी ला आदेश दिले व पूर्व परीक्षेसाठी पात्र करून  मुख्य परीक्षेसाठी बसण्यास परवानगी दिली. सदरील प्रकरणाबद्दल परीक्षार्थी सचिन अनंत शिंदे यांनी न्यायमिळाल्या बद्दल समाधान व्यक्त केले.

 
Top