तुळजापूर (प्रतिनिधी)-  कर्नाटक राज्यातील बीदर येथील रहिवासी असलेले देवेंद्र मुचलांब्रे हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह आज पहाटे श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. दर्शनाच्या वेळी त्यांनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी 50 ग्रॅम म्हणजेच 5 तोळे सोने श्रद्धेने अर्पण केले.

अर्पण केलेल्या मध्ये एक सोन्याची साखळी (चेन) व दोन लहान सोन्याचे डोळे समाविष्ट आहेत. मुचलांब्रे कुटुंब हे निस्सीम देवी भक्त असून ते नियमितपणे देवीच्या दर्शनासाठी येत असतात. देवीच्या दर्शनानंतर त्यांना आत्मिक समाधान मिळते, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.  या श्रद्धा भक्तीची दखल घेत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने मुचलांब्रे कुटुंबीयांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, विश्वास कदम, सहायक जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर, धार्मिक विभागाचे लिपिक राकेश पवार तसेच मंदिर संस्थानचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top